Mon, Jul 06, 2020 16:56होमपेज › Sangli › सांगलीः रेवणगाव घाटात एसटीचा अपघात; ३ ठार, ४ जखमी

सांगलीः रेवणगाव घाटात एसटीचा अपघात; ३ ठार, ४ जखमी

Published On: Apr 24 2018 1:28PM | Last Updated: Apr 24 2018 1:50PMविटा : वार्ताहर

रेवनगाव (ता. खानापूर) घाटात एसटी आणि डंपर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. 

विजय जालिंदर कुंभार (वय 46), तानाजी विलास जाधव (वय47 रा. भडकेवाडी) आणि सुनंदा उत्तम यादव (वय 49 रा.वाटूंबरे ता. संगोला) अशी मृतांची नावे आहेत, तर सत्वशीला श्रीरंग धाने,  दत्तू सुनील धाने (रा,धानेवाडी) आणि साई सुनील धाने अशी जखमींची नावे आहेत.