Sun, Jul 05, 2020 16:41होमपेज › Sangli › सम्राट महाडिकांचा आमदार शिवाजीराव नाईकांना टोला

'वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या नावावर मते मागण्याचे दिवस आता संपले'

Published On: Oct 04 2019 5:30PM | Last Updated: Oct 04 2019 4:44PM

सम्राट महाडिकशिराळा : प्रतिनिधी

वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या नावावर मते मागण्याचे दिवस आता संपले आहेत. असा टोला शिराळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांना प्रचार शुभारंभ सभेत बोलताना लगावला.

यावेळी सम्राट महाडिक म्‍हणाले की, मतदारसंघातील आजी व माजी लोकप्रतिनिधी एकमेकावर टीका करण्यापलीकडे काहीच बोलत नाहीत. त्य‍ांना जनतेच्या प्रश्नांची, मतदारसंघाच्या विकासाशी काहीही देणे -घेणे नाही. चांदोलीसारखा सुंदर परिसर त्यांना आजपर्यंत पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करता आला नाही. आजपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक आता सत्तेसाठी एकत्र आले आहेत.

सम्राट महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातून आज (ता.४) अपक्ष म्‍हणून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्‍यांच्‍या समर्थकांनी मोठ्‍याप्रमाणात गर्दी केली होती. शिराळा मतदारसंघातून भाजकडून आमदार शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे. तर राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून मानसिंगराव नाईक यांना उमदेवारी देण्‍यात आली आहे.