Tue, Jul 14, 2020 02:49होमपेज › Sangli › जत : म्हैशाळ योजनेच्या पाण्यासाठी कडकडीत बंद

जत : म्हैशाळ योजनेच्या पाण्यासाठी कडकडीत बंद

Published On: Aug 28 2019 5:07PM | Last Updated: Aug 28 2019 5:07PM

जत बंदमुळे  शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होताजत: शहर प्रतिनिधी  

कृष्णा नदीचे म्हैशाळ योजनेतून दुष्काळी जत तालुक्यात साठवण व पाझर तलाव भरून द्यावेत, तसेच नगरपरिषद हद्दीतील रस्ते डांबरीकरण करावेत या मागणीसाठी रिपाइं (आठवले गट) च्या वतीने जत शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. रुग्णालये व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती.

जत शहर बंद नंतर रिपाईचे नेते संजय कांबळे व पदाधिकारी यांच्या समवेत तहसीलदार सचिन पाटील, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांची बैठक झाली. यावेळी म्हैशाळ पंपगृहाचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत मिरजकर उपस्थित होते. चर्चेअंती म्हैशाळ योजना लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले. परंतु सध्या पंपगृह दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. पंपगृह दुरुस्तीनंतर येत्या पंधरा दिवसात जत तालुक्यातील तलावांना पाणी सोडण्याचे नियोजन केलेले आहे. शहरातील रस्ते लवकरच सुरू करणार आहेत. तसेच निकृष्ट कामे संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा करून घेणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी सांगितले.

जत यशस्वी बंद करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष  विकास साबळे यांच्या नेतृत्वाखालील तालुकाध्यक्ष संजय पाटील, सुभाष कांबळे, प्रशांत ऐदाळे, सोमनाथ कांबळे ,विनोद कांबळे, संजू राजू कांबळे संजय कांबळे नितीन गायकवाड राहुल वाघमारे ,नवज्योत तांबोळी आदींनी सहभाग घेतला.