मिरज : शहर प्रतिनिधी
शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर सलग दुसर्या दिवशी छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. येथील कमानवेस येथे मंगळवारी दुपारी 3 वाजात ही कारवाई करण्यात आली.शहर पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी माहिती दिली की, कमानवेस येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. तेथे राकेश शशिकांत गोरे (रा. तानाजी चौक, मंगळवार पेठ), चंद्रकांत धोंडिराम पेनकर (रा. कमानवेस), संजय मनोहर तांदळे (रा. बारादारी मजीदजवळ), महेश शंकर लोंढे (रा. कमानवेस), स्वरूप मनोहर तांदळे (रा. कमनावेस) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोबाईल, रोकड, पत्यांचे कॅट असा सुमारे 13 हजार 140 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई सोमवारी रात्री मार्केट येथील राहत कला व सांस्कृतिक मंडळामध्ये पत्त्यांचा जुगार सुरू होता. त्या ठिकाणी छापा टाकून बंडू मारुती गावडे (रा. म्हैसाळ), सुब्बराव अण्णप्पा हुलवान (रा. कोल्हापूर रोड), अकबर बाबासाहेब लवंगे (रा. इदगाह नगर), मेहबूब करीम शेख (रा. गजानन कॉलनी, टाकळी रोड), सुरेश व्यंकटराव बोराडे (रा. वखार भाग, गणेश नगर), मधुकर बाळू आडके (रा. जुगाई कॉलनी, वखार भाग), बसवराज यल्लाप्पा मोरंगी (रा. सोमवार पेठ), सर्जेराव दत्ता हुलवान (धनगर गल्ली), अल्लाअमीन सिकंदर सय्यद (रा. स्टेशन रोड, मिरज) या नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोबाईल, पत्त्याची पाने व रोकड असा 45 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.