होमपेज › Sangli › पुणे-सांगली आता अवघ्या पावणे पाच तासांत  

पुणे-सांगली आता अवघ्या पावणे पाच तासांत  

Published On: Feb 06 2018 3:12PM | Last Updated: Feb 06 2018 3:15PMपुणे : प्रतिनिधी 

पुण्याहून सांगलीला अवघ्या 4 तास 37 मिनिटांत पोहोचणे शक्य झाले आहे. हबिबगंज-धारवाड एक्स्प्रेस ही गाडी सुरू करण्यात आली असून ती पुणे सांगलीमार्गे धावणार आहे. हबिबगंज येथून दर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ही गाडी सुटून पुण्यात शनिवारी सकाळी 9 वाजता पोहोचेल. पुण्यातून सकाळी 9.30 वाजता सुटून ही गाडी सांगलीला दुपारी 2 वाजून 19 मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी पहाटे 5 वाजता सांगली येथून सुटून पुण्यात सकाळी 10.25 वाजता पोहोचेल. पुण्याहून सांगलीला सर्वात जलद पोहोचणारी ही एकमेव गाडी असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे. या गाडीला सातारा, कराड येथे थांबा देण्यात आला आहे. 

पुणे ते सांगली दरम्यान दररोज सुटणारी इंटरसिटी सुरू केल्यास प्रवाशांच्या सोयीचे होणार असून या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असे मत रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.