Tue, Dec 10, 2019 08:22होमपेज › Sangli › जातीच्या नावे मते मागणार्‍यांना थारा देऊ नका

जातीच्या नावे मते मागणार्‍यांना थारा देऊ नका

Published On: Apr 20 2019 1:54AM | Last Updated: Apr 19 2019 11:25PM
कसबे डिग्रज :  वार्ताहर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काही मंडळी मेरिटऐवजी जातीच्या नावावर मते मागत आहेत. मात्र त्यांना थारा देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे महाआघाडी-स्वाभिमानीचे उमदेवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 

आमदार पाटील म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरीविरोधी भूमिका घेताच राजू शेट्टी यांनी धोका पत्करत त्यांना विरोध  केला. शिवाय देशातील शेतकर्‍यांच्या 120 संघटनांना एकत्र करीत देशात एक दबाव गट तयार केला आहे. भविष्यात देशातील शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करीत त्यांचे प्रश्न सोडविण्यास गती देण्यासाठी  शेट्टी यांना साथ द्या.

आमदार पाटील म्हणाले, मोदींनी शेतकर्‍यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी जमीन अधिग्रहण कायद्यात दुरुस्तीचा घाट घातला. तसेच या सरकारने आम्ही दीडपट हमी भाव देऊ शकत नाही असे, सुप्रीम कोर्टात लेखी म्हणणे मांडले. त्यामुळे जेंव्हा संपूर्ण देश मोदी-मोदी करीत होता, तेंव्हा शेट्टी यांनी त्यांची साथ 

सोडली.  या सभेस दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, माजी महापौर सुरेश पाटील,  संदीप राजोबा, जि.प. सदस्य देवेंद्र भोईर, पं स. सदस्य अजयसिंह चव्हाण,  प्रा. सिकंदर जमादार, कुमार लोंढे, अण्णा सायमोते, प्रा. बाळासाहेब मासुले, माजी सरपंच अशोक चव्हाण, मौजे डिग्रज सरपंच सौ. गीतांजली इरकर, बाबासो पाटील, कुमार पाटील यांच्यासह गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.