होमपेज › Sangli › अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांचा धोकाः आंबेडकर

अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांचा धोकाः आंबेडकर

Published On: Jan 13 2018 5:48PM | Last Updated: Jan 13 2018 7:05PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी 

अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांची वाढती ताकत देशाला परवडणारी नाही. याचा विचार जनतेने करायला हवा. ज्याप्रमाणे पाकिस्तान निवडणुका जिंकण्यासाठी हाफिज सईदवर कारवाई करत नाही, त्याचप्रमाणे अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांतील नेत्यांच्यावर भाजपा कारवाई करत नाही असे भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरेगाव-भीमा प्रकरणी ते आज सांगलीत बोलत होते. 

पोलीस खाते देशाशी इमानदार नाही, अनेक महत्वाचे विषय त्यांना माहित असून देखील त्याची माहिती योग्य ठिकाणी जाहीर करत नाहीत. ज्या प्रमाणे न्यायाधिशांनी हिम्मत दाखवली, त्याप्रमाणे पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या मनात काय आहे हे बोलावे, पोलिसांनो तुम्हाला जे माहिती आहे आणि जे काय सुरु आहे हे लोकांना कळूदे अशी त्यांनी पोलिस खात्याला विनंती केली.

ते म्हणाले कि, सोशल मीडियात पंतप्रधानांवर टीका केली तर गुन्हा दाखल केला जातो. मग, मुख्यमंत्र्यांना फेसबुकवर धमकी देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?

ज्या अनियंत्रित संघटना अतिरेकी होऊ लागल्या आहेत. यांच्यातून नविन हाफिज सईद उभा राहू शकतो, अनियंत्रित संघटना ह्या देशाचा ताबा घेत आहेत हे देशाला परवडणारे नाही. या अनियंत्रित संघटना आणि आरएसएसचा देशाला धोका आहे असे ते म्हणाले.