Wed, Jul 15, 2020 17:31होमपेज › Sangli › सांगली : नवविवाहित जोडप्याची आत्महत्या

सांगली : नवविवाहित जोडप्याची आत्महत्या

Published On: Jun 29 2019 8:42PM | Last Updated: Jun 29 2019 8:42PM
भटवाडी (ता.शिराळा) : प्रतिनिधी 

येथील नवविवाहित अविनाश बाळासो खबाले (वय २७) व पत्नी सोनाली अविनाश खबाले (वय २२)यांनी  राहत्या घरी विष प्राशन केल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना काल (ता.२८) घडली. याबाबत भटवाडी येथील पोलीस पाटील  शुभांगी निवास चव्हाण यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली. याबाबत शिराळा पोलिसातून समजलेली माहिती अशी की, अविनाश व सोनाली यांचा सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला. तिचे माहेर विटा असून विवाह झाल्यापासून सहा महिने माहेरी जाणे बंद होते.

मुलीचे वडील व अविनाश यांचा जनावरे विक्रीचा व्यवसाय होता. त्यातून सोनाली व अविनाश यांची ओळख होऊन प्रेमात रूपांतर झाले. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस नाईक दीपक हांडे करत आहेत.