Mon, Jul 06, 2020 18:13होमपेज › Sangli › मिरजेत तृतीयपंथीयाचा चाकूने भोसकून खून 

मिरजेत तृतीयपंथीयाचा चाकूने भोसकून खून 

Published On: Sep 18 2019 10:40AM | Last Updated: Sep 18 2019 10:40AM

संग्रहित छायाचित्रमिरज : प्रतिनिधी 

येथील शहर बसस्थानकाजवळील एका कॉम्प्लेक्समध्ये गौस रज्जाक शेख उर्फ काजल (वय ३५, रा. सिद्धार्थ वसाहत कुरणे वाड्यामागे, मिरज) या तृतीयपंथीयाचा रात्री १२ वाजता चाकूने भोसकून खून करण्यात आला. 

घटनास्थळी पोलिसांना आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. या खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. खुनाची घटना समजताच पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी भेट देऊन पाहणी केली.