Mon, Dec 09, 2019 05:39होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये तरुणावर चाकू हल्ला

कुपवाडमध्ये तरुणावर चाकू हल्ला

Published On: Jul 15 2019 2:02AM | Last Updated: Jul 15 2019 2:02AM
कुपवाड : वार्ताहर 

शहरातील एका तरुणाला दोघांनी अडवून त्याच्याकडील 11 हजार रुपये हिसकाऊन घेऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या हल्ल्यात तरुण जखमी झाला.  लक्ष्मणकुमार गुरा प्रसाद (वय 21, रा. हनुमाननगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. हे दोघेही रेकार्डवरील गुन्हेगार आहेत.संशयित रवी रमेश रामगडे (वय 30, रा. हनुमाननगर) व रोहित विजयकुमार आजेटराव (19, रा. कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी लक्ष्मणकुमार हा  कुपवाड एमआयडीसीतील एका कारखान्यात काम करतो.    शनिवारी त्याने सुट्टी घेतली होती. रात्री तो हनुमाननगर भागातून तो घरी जात होता़. यावेळी संशयित रामगडे व आजेटराव रस्त्यावर थांबले होते. 

या दोघांनी लक्ष्मणकुमारला अडवून त्याच्या खिशातील 11 हजार रूपये हिसकावून घेतले आणि त्याच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला. यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तो गंभीर जखमी झाला. लक्ष्मणकुमारने जखमी अवस्थेत कुपवाड पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी त्याला मिरज शासकीय रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दोघा हल्लेखोरांना अटक केली आहे.