शहरात अमृत योजनेतून विस्तारित भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यात येत आहे. परंतु, गेले वर्षभर टाकीचे काम बंद आहे.
मिरज : प्रतिनिधी
शहरात अमृत योजनेतून विस्तारित भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी उभारण्यात येत आहे. परंतु, गेले वर्षभर टाकीचे काम बंद असल्याने नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
प्रभाग क्रमांक 20 मधील पाणी प्रश्न मिटवण्यासाठी येथे टाकी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टाकी बांधण्याचे काम सुरु करण्यात आले. रेल्वे लाईन जवळील भागात पाईपलाईन टाकण्याचे देखील काम ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. परंतु टाकी उभारणीचे काम महापालिका निवडणूक आधीपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या टाकीचे काम ताबडतोब सुरु करण्यासाठी नगरसेवक थोरात यांनी शोले स्टाईल आंदोलन केले.
tag : miraj, shole, nagarsevak, yogendra thorat, water issue, drought,