Fri, Jul 10, 2020 19:56होमपेज › Sangli › जिल्ह्याच्या विकासासाठी २५० कोटी : ना. सदाभाऊ खोत 

जिल्ह्याच्या विकासासाठी २५० कोटी : ना. सदाभाऊ खोत 

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 13 2018 9:25PM

बुकमार्क करा
वाळवा : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या विकासासाठी 250 कोटींचा निधी आणला. तसेच ताकारी-म्हैसाळ-टेंभू योजनेसाठी 56 कोटींची तरतूद केली असून विकासाच्या कामासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

नागठाणे बंधारा ते हवलदार वस्ती  रस्ता, आष्टा-वाळवा रस्ता, वाळवा-तुजारपूर आदी रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ ना. खोत यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये तरतूद केल्याचे ना. खोत यांनी सांगितले. याप्रसंगी हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, जि. प. महिला व बालकल्याण सभापती डॉ. सुषमा नायकवडी, माजी सरपंच गौरव नायकवडी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील उपस्थित होते. 

शिरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना ना. खोत म्हणाले, शिरगावची पाणीपुरवठा योजना लवकरच मंजूर करू. वाळवा-शिरगाव कृष्णा नदीवर  पूल करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या योजना लवकरच पूर्ण केल्या जातील.

यावेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू वीरधवल नायकवडी, शिरगावच्या सरपंच दीपाली शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींचा ना. खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, डॉ. सुषमा नायकवडी, निशिकांत पाटील आदींच भाषण झाले. 

विलास पवार यांनी स्वागत तर अरविंद पवार यांनी प्रास्ताविक केले. माजी ता. पं. सदस्य गजानन पाटील, नंदिनी नायकवडी, राजाराम शिंदे, प्रकाश शिंदे, अरुण पाटील, डॉ. संताजी घोरपडे, वाळव्याच्या सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.