Mon, Jul 06, 2020 22:57होमपेज › Sangli › सांगली : सुमनताई पाटील,गौरव नायकवडी, विलासराव जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगली : सुमनताई पाटील,गौरव नायकवडी, विलासराव जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Published On: Oct 03 2019 5:49PM | Last Updated: Oct 03 2019 6:11PM

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार सुमनताई पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.तासगाव/इस्लामपूर/जत : प्रतिनिधी

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार सुमनताई पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार मोहनशेठ कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, रोहित पाटील, स्मिता पाटील, सुरेश पाटील, महाकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिताताई सगरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तासगाव शहरातील कृषि उत्पन्न बाजार समिती जवळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समवेत शहरातून फेरी काढत आमदार सुमनताई पाटील यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. 

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातू शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार व क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नातू गौरव नायकवडी यांनी गुवरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र यावेळी त्यांचे चुलते, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी हे मात्र अनुपस्थित होते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गौरव नायकवडी यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध नाही ना? अशी चर्चा आता मतदारसंघात सुरु झाली आहे.

गौरव नायकवडी यांना अनपेक्षित इस्लामपूर मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली. गुरुवारी त्यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ना. सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, सेनेचे आनंदराव पवार, भाजपाचे विक्रम पाटील, वैभव शिदे आदी यावेळी उपस्थित होते. मात्र वैभव नायकवडींची अनुपस्थित सर्वांनाच जाणवली.

जत तालुक्याच्या विकासासाठी गेली चाळीस वर्ष अविरतपणे राजकारण समाजकारणात सक्रिय आहे. गेल्या पाच वर्षात तालुक्यच्या विकासासाठी भरीव असा विकास निधी खेचून आणला आहे. यामुळे जनता मला साथ देणार आहे. माझा वारसदार कोण याचा निर्णय जनतेतूनच होईल. तसेच नव्याने उदयास आलेली तिसरी आघाडी म्हणजे नेते एकीकडे जनता माझ्याकडे अशी अवस्था झाली आहे .त्यामुळे आपला विजय हा निश्चित असल्याचे प्रतिपादन भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विलासराव जगताप यांनी केले  जत विधानसभेसाठी आमदार जगताप यांनी महायुतीच्या वतीने शहरातुन पदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उमेदवारी अर्ज दाखल केला .