Wed, Jun 26, 2019 15:42होमपेज › Sangli › सांगलीत प्रस्थापितांना गाडू : गोपीचंद पडळकर 

सांगलीत प्रस्थापितांना गाडू : गोपीचंद पडळकर 

Published On: Apr 03 2019 4:41PM | Last Updated: Apr 03 2019 4:41PM
सांगली : प्रतिनिधी

वसंतदादांच्या नावाची दुकानदारी येथून पुढे चालू देणार नाही. खासदारांच्या गुंडगिरीला आम्ही घाबरुन रडत बसणारे कार्यकर्ते नसून लढणारे कार्यकर्ते आहोत. तसेच दोन्ही प्रस्तापितांना गाडू अशी टीका सांगलीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी स्टेशन चौकातील जाहीर सभेत केली.

ते म्हणाले, संजय पाटील यांना पाच वर्षासाठी खासदार निवडून दिले होते. लोकसभेत जावून काय दिवे लावले? कारखाने घशात घालण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. अशी बोचरी टीका खा. संजय पाटील यांच्यावर पडळकर यांनी केली.

इतकी वर्षे सत्ता उपभोगूनसुद्धा अजून सेवा करायची आहे असे काहीजण म्हणत आहेत. देशसेवेची एवढीच हौस असेल तर तुमची पोर देशसेवसाठी सैन्यात पाठवा. तसेच सांगलीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून आता ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी बनल्याचेही त्यांनी सांतिगतले. या जाहीर सभेवेळी प्रकाश शेंडगे, उत्तमराव जानकर, सचिन माळी यांच्यासह वंचीत बहुजन आघाडीचे नेते उपस्थित होते.