Sat, Dec 07, 2019 09:56होमपेज › Sangli › इस्लामपुरातून अपहरण झालेला विद्यार्थी सापडला

इस्लामपुरातून अपहरण झालेला विद्यार्थी सापडला

Published On: Jun 05 2019 12:29PM | Last Updated: Jun 05 2019 12:33PM
इस्लामपूर : वार्ताहर 

येथून सोमवारी सायंकाळी अपहरण झालेला वरदराज बाळासाहेब खामकर हा मुलगा मंगळवारी दुपारी शिरोली एमआयडीसी परीसरात सुखरुप सापडला. इस्लामपूर पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे वरदराजला पळवणाऱ्या तिघांना पकडण्यात यश आले.

पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता संशयिताना पकडल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या प्रकरणातील मुख्य सु्त्रधार सुनील कदमसह तिघांना पोलिसांनी अटक केली. सुनील हा वरदराच्या वडिलांचा भाचाच असुन तो पोलिस आहे. सध्या तो गडहिंग्लज पोलिस ठाण्यात पोलिस म्हणून सेवा बजावत आहे. आर्थिक देवघेवीतून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे.

सोमवारी सायंकाळी ताकारी रोडवरील एका क्‍लासजवळून अज्ञातांनी वरदचे अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली होती. त्याचे कारमधून आलेल्या काहींनी अपहरण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते.