Mon, Dec 09, 2019 05:42होमपेज › Sangli › मिरजेत 17 लाखांच्या फसवणूक 

मिरजेत 17 लाखांच्या फसवणूक 

Published On: Dec 03 2018 1:43AM | Last Updated: Dec 03 2018 12:26AMमिरज : शहर प्रतिनिधी 

भारती एक्सा कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून बनावट पॉलिसीच्या पावत्या देऊन सुमारे सतरा लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ जणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी बाजीराव चव्हाण (मूळ रा. हरिपूर, सध्या रा. इचलकरंजी) याला रविवारी अटक करण्यात आली.

याबाबत फसवणूक झालेल्या राजाराम सहदेव चव्हाण (रा. मिरज) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. चव्हाण यांना गुंतवणुकीचा लाभ मिळवून देण्यासाठी बनावट पॉलिसीच्या पावत्या देण्यात आल्या होत्या. त्यातून त्यांची 17 लाख रुपयांची फसवणूक झाली. सुमारे तीन वर्षांपासून ही फसवणूक करण्यात आली.  

या प्रकरणी त्यांनी तक्रार दिल्या नंतर राहुल जोशी, तानाजी केसरकर, गणेश पवार, बाजीराव चव्हाण, शैलेश भोईटे, सुशांत पाटील, सिंघानिया व अन्य एक अशा आठ जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. बाजीराव चव्हाण याला इचलकरंजी येथून अटक करण्यात आली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे सहायक उपनिरीक्षक देशमुख यांनी सांगितले.