Fri, Jul 03, 2020 21:53होमपेज › Sangli › बुधवारी साजरा होणार ‘उत्सव नात्यांचा’

बुधवारी साजरा होणार ‘उत्सव नात्यांचा’

Last Updated: Nov 08 2019 1:52AM
सांगली : प्रतिनिधी
दै. पुढारी कस्तुरी क्‍लब आणि झी मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम बुधवारी ( दि. 13 ) सायंकाळी 4.30 वाजता भावे नाट्यगृह येथे होणार आहे. 

या कार्यक्रमामध्ये झी मराठी फेम पल्लवी वैद्य आणि स्नेहलता वसईकर यांच्या खुमासदार सूत्रसंचालनासोबत रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेतील माई (शकुंतला नारे), सरिता (प्राजक्ता वाडिये), दत्ता (सुहास शिरसाठ) यांच्याशी दिलखुलास गप्पांसोबत गायिका चैतन्य कुलकर्णी आणि अमृता नातू यांच्या सुमधूर गीतांची  मैफील रंगणार आहे. 

याशिवाय सॅड्रीक डीसुझा  यांचा नृत्याविष्कार कस्तुरी क्‍लब सभासदांना अनुभवास मिळणार आहेे. 

हा कार्यक्रम कस्तुरी सभासदांसाठी विनामूल्य असून कस्तुरी क्‍लबचे आजच सभासद व्हा आणि कायक्रमाचा आनंद घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क - पुढारी कार्यालय, जिल्हा परिषदेसमोर, सांगली. फोन- 0233- 6629928, तनईम अत्तार - 9325477714, 9850410522