Sat, Aug 24, 2019 10:37होमपेज › Sangli › पतीचा महिलेवर खुरप्याने हल्ला

पतीचा महिलेवर खुरप्याने हल्ला

Published On: Apr 07 2019 1:46AM | Last Updated: Apr 07 2019 12:13AM
सांगली : प्रतिनिधी

समडोळी (ता. मिरज) येथील बसस्थानक परिसरात पत्नीवर पतीने खुरप्याने हल्ला केला. यामध्ये पूजा महावीर पाटील (वय 35) जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पतीविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महावीर सुभाष पाटील (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी पूजा आजीला सोडण्यासाठी समडोळीतील बसस्थानक परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पती महावीर पाटील तेथे आला. त्याने पत्नीला पाहिल्यानंतर “तू कोठे चालली आहेस, माझ्यासोबत आताच चल”, असा तगादा लावला. पत्नीने नकार दिल्यानंतर त्याने  शिवीगाळ केली. नंतर त्याने पत्नीवर हातातील खुरप्याने त्यांच्यावर वार केला. 

तो वार त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला वर्मी बसला. त्या तेथेच कोसळल्या. नंतर महावीर तेथून पळून गेला. पूजा पाटील यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.