Sat, Aug 24, 2019 09:46होमपेज › Sangli › अनिकेत कोथळे खूनप्रकरण :वकिलांना भेटण्याची परवानगी द्यावी

अनिकेत कोथळे खूनप्रकरण :वकिलांना भेटण्याची परवानगी द्यावी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणाच्या  खटल्याची सुनावणी आता सत्र न्यायालयात सुरू करण्यात आली आहे. आज संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातही जणांना  जिल्हा व सत्र न्यायाधीश  न्या. एस. एस. सापटणेकर यांच्या समोर उभे करण्यात आले.  त्यावेळी सर्वानाच 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्या. सापटणेकर यांनी दिले. त्यावर आता दि. 13 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान आज सर्वच संशयितांनी वकिलांना भेटण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज न्यायालयात सादर केला. 

याप्रकरणाचा तपास  सीआयडीकडे आहे. सीआयडीतर्फे दि. 5 फेब्रुवारी रोजी संशयितांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दि. 1 जानेवारीला झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने पोलिसांच्या विनंतीनुसार या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दि. 5 मार्च रोजी सर्व संशयितांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यात आले होते.

त्यानंतर आज पुन्हा सर्वच संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. अनिकेत कोथळे खून प्रकरणातील संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे यांना हजर करण्यात आले होते. दरम्यान आरोपपत्र दाखल झाल्यानंतर यावर प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र दि. 21 फेब्रुवारी रोजी हा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यावर आज पुन्हा सुनावणी झाली. आता यावर 13 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 

 

Tags : sangli, sangli news, aniket kothale, murder case, sessions court, 


  •