Thu, Jun 04, 2020 12:25होमपेज › Sangli › ...म्हणूनच जनतेची भाजपला साथ : अमित शहा

...म्हणूनच जनतेची भाजपला साथ : अमित शहा

Last Updated: Oct 10 2019 1:37PM
सांगली : पुढारी ऑनलाईन

काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यात पंतप्रधान नरेंद मोदी यांना यश आले आहे आणि याच मुद्यावरून सर्व भारत आमच्या सोबत असल्याचा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्यक्त केला. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर असणा-या अमित शहा यांची आज जत (जि. सांगली) येथे प्रचारसभा झाली. यावेळी प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. आपल्या भाषणात शहा यांनी अनेक मुद्दे मांडत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टिका केली. 

शहा म्हणाले, ज्यावेळी पीएम नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव मांडला; त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध दर्शवला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मनात कलम ३७० हटवण्या बद्दल नेमकी काय भूमिका आहे ती त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करावी, असे शहा यांनी यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यानां आव्हान दिले. 

तसेच, लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. त्यावेळी भाजपला पुन्हा निवडून देण्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मोदींच्या झोळीत कमळच कमळ भरले. मोदी यांनी कलम ३७० हटवून देशाला संपुर्ण बनवले आहे. आज अखंड भारताचे सरदार पटेल यांचे स्वप्न मोदी यांनी पूर्ण केले आहे. असेही ते म्हणाले.