Mon, Dec 16, 2019 10:52होमपेज › Sangli › सांगलीत चाकू घेऊन फिरणार्‍या युवकास अटक

सांगलीत चाकू घेऊन फिरणार्‍या युवकास अटक

Published On: Jan 17 2019 1:37AM | Last Updated: Jan 16 2019 8:42PM
सांगली : प्रतिनिधी

शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरात चाकू घेऊन फिरणार्‍या युवकास विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. समीर अकबर सनदी (वय 19, रा. हनुमाननगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी हत्यारे घेऊन फिरणार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी शंभर फुटी रस्ता परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी समीर सनदी संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ एक धारदार चाकू सापडला. त्याला अटक करण्यात आली आहे. 

विश्रामबागचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक परीट, अमोल भोळे, मिथून गंगधर, महेश वत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या परिसरात अनेक फाळकूटदादा दहशत माजवित आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.