Thu, Jul 02, 2020 10:47होमपेज › Sangli › अनैतिक संबंधात अडसर; पत्नीनेच केला पतीचा खुन

अनैतिक संबंधात अडसर; पत्नीनेच केला पतीचा खुन

Published On: May 02 2018 6:57PM | Last Updated: May 02 2018 6:57PMविटा : प्रतिनिधी 

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने चक्क पत्नीनेच आपल्या पतीचा खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील विट्याजवळील घाडगेवाडी येथे मंगळवार (दि. १ मे) रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. अरुण प्रल्हाद घाडगे (वय-३१) असे या मयत पतीचे नाव आहे.  

या प्रकरणी सुहास तुकाराम शिंदे (वय - 26) आणि रुपाली अरुण घाडगे (वय - 23) या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसरा संशयित अक्षय रघुनाथ पिसाळ (25) हा फरारी आहे. याबाबत मृताचे वडील प्रल्हाद मारुती घाडगे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अरुण प्रल्हाद घाडगे यांचा राजधानी दिल्लीतील चांदणी चौकात गलाई व्यवसाय आहे. त्यांचे मूळ गाव विट्या पासून ५ किमी अंतरावर घाडगेवाडी आहे. आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी घाडगे गावी आले होते. काल, मंगळवार (दि. १ मे) सायंकाळी सात वाजता घरी गावदेवाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अरुण घाडगे अचानक गायब झाले. गाडी व मोबाईल घरातच विसरून गेल्याने कुटुंबातील व्यक्तीनी आणि गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास विटा ते पारे रस्त्याकडेच्या रामचंद्र घाडगे यांच्या शेतातील जनावरांच्या शेड समोर अरुण घाडगे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची तत्काळ माहिती विटा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत यासंबंधी तपास केला. तर मृत देह शवविच्छेदनासाठी विटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. 

अरुण याचा रुपाली सोबत गेल्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र रूपालीचे आपल्या सख्या बहिणीच्या नवऱ्या सोबत म्हणजे सुहास शिंदे बरोबर अनैतिक संबंध होते. त्यामुळे रुपाली आपल्या नवऱ्याबरोबरच्या दिल्लीतील संसारात रमली नाही. अखेरीस रुपालीने आपल्या अनैतिक संबंधांना बाधा येवू नये म्हणून मेव्हण्याच्या साथीने नवऱ्याचा गेम करायचे ठरवले . काल मंगळवार (१ मे) दुपारी चार वाजता रूपालीने पोटात दुखण्याचा बहाणा करून पती अरुण बरोबर विट्याला आली. याचवेळी तिथे मेव्हणे सुहास आणि अक्षय यांना बोलवून घेतले. 

सगळे गाव देवाच्या कार्यक्रमात व्यस्त असताना अरुणला सुहास आणि अक्षयने बोलवून घेतले. त्यास विटा ते पारे रस्त्याकडेच्या रामचंद्र घाडगे यांच्या शेतातील जनावरांच्या शेडमध्ये नेले. तिथे दारू प्राशन करून अरुणचा काटा काढला.  अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विटा पोलिस यांनी  12 तासात या गुन्ह्याचा छडा लावला. पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ अधिक तपास  करीत आहेत.