Mon, Sep 16, 2019 12:34होमपेज › Sangli › विशाल पाटील यांची सांगलीवाडीत पदयात्रा 

विशाल पाटील यांची सांगलीवाडीत पदयात्रा 

Published On: Apr 07 2019 1:46AM | Last Updated: Apr 06 2019 8:29PM
सांगली : प्रतिनिधी 

सांगली लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांची सांगलीवाडीत पदयात्रा झाली. नागरिकांनी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. पदयात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. 

काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, राष्ट्रवादीचे कमलाकर पाटील, नगरसेवक विष्णू माने, माजी नगरसेवक दिलीप पाटील, हरिदास पाटील,  महाबळेश्वर चौगुले, आनंदराव पाटील, जी. के. पाटील, पी. आर. पाटील, विजय पाटील, अभिजित कोळी, प्रभाकर पाटील, आकाराम कदम, संपत पाटील, सुखदेव मोहिते, पांडुरंग भिसे, उदय पाटील, विठ्ठल पाटील, वंदना कदम, बजरंग फडतरे, अशोक पाटील, बाळासाहेब कदम, सचिन पाटील व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सांगलीवाडीतील राममंदीर येथे श्रीफळ वाढवून पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेची सांगता राममंदीर समोर झाली.  विशाल पाटील म्हणाले, सांगलीवाडीकरांनी यापूर्वी वसंतरावदादा पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील आणि प्रतीक पाटील या सगळ्यांवर भरभरून प्रेम केले आहे. तसेच प्रेम माझ्यावरही करावे. मी सांगली, सांगलीवाडी व जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. लोकांचा विश्वास सार्थ ठरवीन.