Mon, Sep 16, 2019 11:43होमपेज › Sangli › तुंगतजवळ अपघातात २ जण ठार

तुंगतजवळ अपघातात २ जण ठार

Published On: Dec 17 2018 1:38AM | Last Updated: Dec 16 2018 11:39PM
पंढरपूर : प्रतिनिधी

तुंगत (ता. पंढरपूर) येथे मोहोळ - पंढरपूर रस्त्यावर बोलेरो जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातात स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील  दोन कर्मचारी ठार झाले. चालक सागर लोंढे हा जागीच ठार झाला तर प्रशांत पाटोळे यास सोलापूरला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

स्वेरीचे ज्येष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी मिरजेला हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. स्वेरीचे ज्येष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे यांना मोहोळ येथून घेऊन बोलेरो जीप पंढरपूरकडे जात होती. तुंग येथील जुन्या टोल नाक्याच्या पुढील बाजूस आल्यानंतर रस्त्यात कुत्रे आडवे आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा जीपवरील ताबा सुटला आणि जीप रस्त्याच्या बाजूच्या झाडावर जाऊन आदळली.