Mon, Dec 16, 2019 08:27होमपेज › Sangli › सांगलीत दोन लाखांचा गुटखा जप्‍त

सांगलीत दोन लाखांचा गुटखा जप्‍त

Published On: Jul 27 2019 1:31AM | Last Updated: Jul 27 2019 1:31AM
सांगली : प्रतिनिधी

येथील कर्नाळ पोलिस चौकीजवळील गोदामावर छापा टाकून दोन लाख रुपये किमतीचा गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी हनीफ आयुब महात (वय 29, रा. शिवशंभो चौक, सांगली) या पान दुकानदारास ताब्यात घेतले आहे. शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.हनीफ महात याचे बुरूड गल्लीत पान दुकान आहे. तो गुटखा व पान मसाल्याची विक्री करीत करतो. कर्नाळ पोलिस चौकीजवळ पत्र्याच्या शेडमध्ये गोदाम करुन त्याने गुटख्याचा साठा केला आहे, अशी माहिती मिळाली. 

पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या पथकाने प्रथम महात याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या गोदामावर छापा टाकला. यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व पान मसाला सापडला. रात्री उशिरापर्यंत या मालाची मोजदाद सुरू होती. अंदाजे दोन लाखांचा हा माल असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा माल जप्त करून पोलिस व्हॅनमधून पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आला. महात याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे निरीक्षक   पाटील यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन विभागाला या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. कर्नाटकातून हा माल आणला असण्याची शक्यता आहे, पोलिसांनी व्यक्त केली.