Tue, Nov 19, 2019 11:21होमपेज › Sangli › डंपरने धडक दिल्याने दोन ठार

डंपरने धडक दिल्याने दोन ठार

Published On: Jul 12 2019 1:58AM | Last Updated: Jul 12 2019 1:58AM
जत : शहर प्रतिनिधी

जत-सांगली रस्त्यावर सिमेंट वाहतूक करणार्‍या डंपरने दोन मोटारसायकलना धडक दिली. या अपघातात  दोन  ठार आणि दोन जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी झाला. मोहन महादेव भंडारे (वय 30) आणि तुषार प्रताप भंडारे (21, दोघे रा. येळावी, ता. तासगाव) अशी मृतांची  नावे आहेत.ऋषिकेश  भंडारे, अनिकेत विकास भंडारे (दोघेही रा. येळावी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः येळावी येथील एका मुलीचे लग्‍न कोळगिरी (ता. जत) येथे होते. या लग्‍नासाठी दोन मोटारसायकलींवरून  चौघेजण जतच्या दिशेने जात होते. जत-सांगली रस्त्यावर पाटील वस्तीजवळच्या वळणावर दोन्ही मोटारसायकलींना डफळापूरच्या दिशेने जाणार्‍या डंपर (एन. एल. 01 ए. सी 6308) ने  धडक दिली.या धडकेमुळे एका  मोटारसायकलवरील मोहन भंडारे व तुषार  भंडारे  गंभीर जखमी झाले होते.  मोहन भंडारे याचा  जबर मार लागल्याने  जागीच मृत्यू झाला.  तुषार भंडारे गंभीर जखमी झाला होता.  दुसर्‍या मोटरसायकलीवरील ऋषिकेश  भंडारे, अनिकेत विकास भंडारे जखमी झाले. या तीन जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र  तुषार  भंडारे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

जत पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. डंपरचालक  राजेंद्र महादेव होळकर (वय 36, रा. डिकसळ, ता. सांगोला) याला पोलिसांनी अटक केली आहे. जत पोलिस ठाण्यात लक्ष्मण विकास भंडारे यांनी फिर्याद दिली आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गुंडरे तपास करीत आहेत.