Sat, Aug 17, 2019 23:24होमपेज › Sangli › सांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी

सांगली- मिरज रस्त्यावर अपघात; दोघे जखमी

Published On: Jul 22 2019 1:33PM | Last Updated: Jul 22 2019 1:33PM
सांगली : प्रतिनिधी 

सांगली - मिरज रस्त्यावर केटीएम व बुलेट यांच्यात जोरदार धडक होवून आज सोमवार (दि.२२ रोजी) हा अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. 

या अपघातात केटीएम व बुलेट यांच्यातील जोरदार धडकेत केटीएमचे चेस तुटले आहे. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. 

या अपघातातील जखमींना उपचारासाठी मिरजेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.