Wed, Jul 08, 2020 05:06होमपेज › Sangli › टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे कधी सुरू होणार? 

टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे कधी सुरू होणार? 

Published On: Mar 23 2018 2:00AM | Last Updated: Mar 22 2018 9:17PMविटा : विजय लाळे 

टेंभू योजनेच्या नेवरी वितरिका आणि त्यावरील 9 उपवितरिकांच्या कामांच्या आराखड्यास दोन महिन्यांपूर्वी मंजुरी मिळालेली आहे.  या वितरिकेद्वारे तब्बल चार हजाराहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मात्र कामास कधी सुरुवात होणार, याबाबत शेतकरी वर्गात उत्सुकता आहे. 

टेंभू उपसा जलसिंचन योजनेची कामे सध्या गतीने होत आहेत.  खानापूर घाटमाथ्यावर पाणी जाण्यासाठी टप्पा क्रमांक 4 आणि 5 ची कामे सुरू आहेत. खानापूर आणि कडेगाव या दोन तालुक्याच्या सीमारेषेवरून जाणार्‍या नेवरी कालवा आणि उपवितरिकेच्या आराखड्याला दि. 5 जानेवारीरोजी  मंजुरी मिळालेली आहे. परंतु कामे कधी सुरू होणार, याची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे. 

पूर्वीचा जो 105 किलोमीटरचा खानापूर - तासगाव एक्सप्रेस कालवा होता. तो सन 2016 मध्ये 41 किलोमीटरपर्यंत मर्यादित करण्यात आलेला आहे. तर याच खानापूर- तासगाव कालव्याच्या 21 व्या किलोमीटरला गार्डीजवळ नेवरी ही वितरिका सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार ही वितरिका साधारणपणे 14 किलोमीटर लांबीची आहे. या वितरिकेला उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंना अनुक्रमे 4 आणि 5  उपवितरिका काढण्याचे नियोजन आहे. 14 किलोमीटर या वितरिकेच्या व्यास 1 हजार 400 मिलीमीटर ते 250 मिलीमीटर इतका आहे. तर एकूण 2. 32 घनमीटर प्रतिसेकंद वेगाने पाणी या वितरिकेतून थेट 965 हेक्टरसाठी तर उपवितरिकांच्या माध्यमातून 3 हजाराहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या वितरिकांच्या परिघात (दोन्ही बाजूंना या अर्थी ) 38 किलोमीटरपर्यंत टेंभूचे पाणी मिळणार आहे. 

थेट ओलिताखाली येणारी गावे आणि क्षेत्र (हेक्टर) पुढीलप्रमाणे :  खानापूर तालुका : गार्डी (268.05), घानवड (138.01), हिंगणगादे (119. 42)  , विटा (457.77) , ढवळेश्वर (548.73), कळंबी (36.88), भाळवणी (223.71), कडेगाव तालुक्यातील नेवरी (1271.73), आंबेगाव (204.10), शेळकबाव (111.12), वडियेरायबाग (668.52) या गावांना लाभ होणार आहे. दरम्यान, या कामांना तातडीने सुरुवात करण्याची मागणी होत आहे.

Tags :