Fri, Dec 13, 2019 06:08होमपेज › Sangli › मालगाव येथील तरुणाचा खोटे सोने दिल्याने खून 

मालगाव येथील तरुणाचा खोटे सोने दिल्याने खून 

Published On: Nov 06 2018 12:44AM | Last Updated: Nov 06 2018 12:44AMमिरज : शहर प्रतिनिधी

सिद्धेवाडीत झालेल्या शारजान शहाजी काळे (रा. मालगाव) याच्या खून प्रकरणी दिनेश चिंचकर (रा. बामणोली) व त्याचे अन्य सात साथीदार अशा आठ जणांच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित दिनेश याला शारजान याने खोटे सोने देऊन फसवणूक केल्याने त्याचा राग मनात धरून त्याचा खून केल्याची तक्रार शारजानच्या वडिलांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. 

दिनेश याला शारजानने काही महिन्यापूर्वी सोने दिले होते. त्या बदल्यात दिनेशने शारजानला 50 हजार रूपये दिले होते. मात्र ते सोने बनावट निघाल्याने दिनेश हा सरजानकडे 50 हजार रूपयांची मागणी करीत होता. ते पैसे न दिल्याने दिनेश हा शारजानवर चिडून होता. शनिवारी सायंकाळी दिनेश हा त्याच्या सात साथीदारांसमवेत मालगाव येथे आला. त्यावेळी शितल भंडारी याला मारहाण करून त्याची कार त्यांनी घेतली. त्या कारमध्ये शारजान याला घालून सिद्धेवाडी येथे घेऊन आले. तेथे त्याला  मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. असे  शारजानच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिनेश व अज्ञात सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले. याप्रकरणातील सर्वांना लवकरच अटक करू, असेही ते म्हणाले.