होमपेज › Sangli › कर्नाळमध्ये विहिरीत पोहताना मुलाचा मृत्यू

कर्नाळमध्ये विहिरीत पोहताना मुलाचा मृत्यू

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 13 2019 1:36AM
सांगली : प्रतिनिधी 
कर्नाळ (ता. मिरज) येथे विहिरीत पोहायला गेलेल्या नऊ वर्षांच्या योगीराज गजानन मोहिते याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना घडली.  योगीराज  दुपारी  मित्रांसोबत बसस्थानकजवळील विहिरीत पोहायला गेला होता. पोहायला येत नसल्याने तो पाठीला डबा बांधून विहिरीत उतला. काही वेळानंतर तो विहिरीत दिसेनासा झाला. काही तरुणांनी विहिरीत उतरून शोध घेऊन  योगीराजला तातडीने येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा   मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.