Sat, Jul 04, 2020 11:18होमपेज › Sangli › सांगली : तासगावात कोरोनाचा कहर, आणखी पाचजण बाधित 

सांगली : तासगावात कोरोनाचा कहर, आणखी पाचजण बाधित 

Last Updated: Jul 01 2020 9:54AM
तासगाव (सांगली) : पुढारी वृत्तसेवा 

तासगाव शहरात मंगळवारी रात्री उशीरा तीन पुरुष आणि दोन महिला असा पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी चौघे जण शहरातील प्रसिध्द खासगी दवाखान्यातील कर्मचारी असून एक जण शहरातीलच प्रसिध्द सोनोग्राफी सेंटरचा टेक्निशियन आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे.

वाचा : सांगलीत नवे 16 पॉझिटिव्ह; 15 कोरोनामुक्‍त

मंगळवारी रात्री अगोदर ५० वर्षाची महिला आणि ४० वर्षाच्या पुरूषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर रात्री उशीरा प्रलंबित असणाऱ्या आणखी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ६० वर्षाचा पुरुष आणि २२ वर्षाची महिला हे दवाखान्यातील कर्मचारी तर ३४ वर्षाचा सोनोग्राफी सेंटरमधील टेक्निशियन पुरुष यांचा समावेश आहे. या दरम्यान एकाच दिवसांत पाच कोरोना बाधित सापडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

वाचा : नवे 16 पॉझिटिव्ह; 15 कोरोनामुक्‍त

रविवारी वाघापूर येथील एका २२ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या कोरोना बाधित महिलने सावळज आणि तासगाव येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते. यानंतर प्रशासनाने दोन्ही दवाखाने तीन दिवसांसाठी सील केले आहेत. डॉक्टर आणि सर्व कर्मचा-यांच्या स्वॅबचे नमूने घेण्यात आले होते. सर्वांना १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याचे ही आदेश देण्यात आले आहेत.