Thu, Jul 02, 2020 11:31होमपेज › Sangli › जतचा विकासाचा अनुशेष भरून काढला  

जतचा विकासाचा अनुशेष भरून काढला  

Published On: Apr 04 2019 2:02AM | Last Updated: Apr 03 2019 9:26PM
जत :शहर प्रतिनिधी

तालुक्यात विविध विकासकामे केली आहेत.अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरुन काढलेला आहे. यापुढेही तालुक्यातील सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची माझी जबाबदारी  असेल, असे प्रतिपादन  महायुतीचे उमेदवार खासदार संजय  पाटील यांनी  केले. मुचंडी, दरिकोणूर, दरीबडची, संख, तिकोंडी, कोंत्यावबोबलाद, उमदी, निगडी बुद्रूक, उटगी, सोन्याळ, जाडर बोबलाद, माडग्याळ, व्हसपेठ, कोळगिरी व वळसंग या गावात खासदार पाटील यांनी  प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी ते  बोलत होते.आमदार विलासराव जगताप,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे,   शिवाजीराव ताड, डॉ. रविंद्र आरळी, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, तमण्णगौडा रवी पाटील, सुनिल पवार, सरपंच अशोक पाटील ,  अजित पाटील, बंटी दुधाळ आदी उपस्थित होते. 

खासदार पाटील   म्हणाले , तालुक्याच्या पूर्व  भागातील वंचित गावांचा समावेश म्हैसाळ योजनेच्या विस्तारित टप्प्यामध्ये होणार आहे.  विस्तारित म्हैसाळ योजनेतून तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी मिळेल. या संपूर्ण तालुक्यात म्हैसाळचे पाणी येईल तेव्हा हा तालुका  सुजलाम सुफलाम होईल. कारण कष्ट करण्याची या तालुक्यात शेतकर्‍यांची तयारी आहे.  आमदार जगताप म्हणाले, जत तालुक्याला म्हैसाळचे पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून   संघर्ष सुरू आहे. पश्‍चिम , उत्तर आणि दक्षिणेच्या काही भागात आता पाणी आले आहे. ते खासदार पाटील यांच्या मुळेच आले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांनाच निवडून दिले पाहिजे.  तीस वर्षे म्हैसाळचे  काम थांबले होते. मात्र खासदार पाटील यांनी या योजनेला गती दिली आहे. जूनपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत. 

भूलभुलैय्याला भुलू नका : आमदार जगताप

आमजार जगताप म्हणाले,  विरोधकांना प्रचारासाठी आल्यावर एकच प्रश्‍न विचारा “आमच्या जत तालुक्यासाठी तुम्ही काय केले आहेत?’’  काहीजण  भूलभुलैय्या करून मते देण्याचे आवाहन करतील, मात्र त्यांना वरील प्रश्‍न जरूर विचारा. त्यांच्याजवळ या प्रश्‍नाचे उत्तर नसेल.