Mon, Dec 09, 2019 05:40होमपेज › Sangli › भाजप सरकारने शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला  

भाजप सरकारने शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला  

Published On: Apr 11 2019 2:10AM | Last Updated: Apr 10 2019 11:05PM
कासेगाव : प्रतिनिधी 

लोकसभेच्या निवडणुकीनंतर सरकार कोणाचेही आले तरी शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी वेळ पडली तर  रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी मी सदैव  तयार आहे. भाजप सरकारने शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला आहे, असा आरोप   खासदार  राजू शेट्टी यांनी केला. कासेगाव ( ता. वाळवा ) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

खासदार शेट्टी म्हणाले,  मोदी सरकारने शेकर्‍यांच्या विरोधात निर्णय घेतले म्हणून भाजपमधून बाहेर पडलो.त्यांनी शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या नाहीत. देशाचे संविधान धोक्यात आले असून लोकशाही मोडीत काढण्याचा डाव भाजपने रचला आहे . 

जयंत पाटील म्हणाले,  पाच वषार्ंत मोदी सरकारने तळागाळातील सर्व घटकांचे शोषण करण्याचे काम केले .पाच वर्षांत एकही आश्वासन पूर्ण केले नाही.   नियोजन आयोग रद्द करुन निती आयोग आणला.   जी .एस.टी., नोटाबंदी असले निर्णय घेतला.  खतांच्या किंमती वाढवल्या. राज्य सरकारने विजेचे दर वाढवले. यांच्या कारभारामुळे जनता हैराण झाली आहे. 

जिल्हा परिषदेचेे माजी अध्यक्ष देवराज पाटील म्हणाले,   वाळवा तालुक्यातून राजू शेट्टींना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, संदीप राजोबा, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष संग्राम पाटील, यांची भाषणे झाली.

प्रास्ताविक सरपंच किरण पाटील यांनी केले. आभार उपसरपंच दाजी गावडे यांनी मानले. सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले .   जनार्दन पाटील,  शामराव पाटील,माजी सभापती रणजीत पाटील  उपस्थित होते .