Tue, Jul 14, 2020 02:46होमपेज › Sangli › पोलिस अधिकार्‍यासह दोघेजण निलंबित

पोलिस अधिकार्‍यासह दोघेजण निलंबित

Published On: Jul 05 2019 1:34AM | Last Updated: Jul 04 2019 11:44PM
सांगली : प्रतिनिधी

कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे व हवालदार प्रवीण यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी ही कारवाई केली. दोघांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही शर्मा यांनी दिले आहेत. 

 शेवाळे यांच्याकडे कुपवाड पोलिस ठाण्याचा कार्यभार होता. महिन्यापूर्वी त्यांची कुपवाड पोलिस ठाण्यातून बदली झाली होती. महिन्यापूर्वी त्यांची पदोन्‍नतीवर (पोलिस निरीक्षक) नागपूरला बदली झाली आहे. प्रवीण यादव यांचीही कोकरूड पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

शेवाळे व यादव यांच्याबद्दल एक तक्रार आली होती. त्याची दखल घेऊन शर्मा यांनी दोघांनाही निलंबित केले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांना शेवाळे व यादव यांची खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.