Sun, Jul 05, 2020 16:14होमपेज › Sangli › विशाल पाटील यांना पाठिंबा द्या : जयश्री पाटील

विशाल पाटील यांना पाठिंबा द्या : जयश्री पाटील

Published On: Apr 06 2019 1:50AM | Last Updated: Apr 05 2019 9:25PM
सांगली : प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघातील महाआघाडी - स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा द्या. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन  काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी केले. त्यांनी विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी खणभागासह परिसरात पदयात्रा काढली. त्यावेळी मतदारांशी संवाद साधला.

घराघरात जाऊन त्यांनी विशाल पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन केले. हिराबाग कॉर्नर येथे श्री गणेश मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. फौजदार गल्ली, लाळगे गल्ली, बदाम चौक, पाथरवट गल्ली, मार्टिन गल्ली, कोठावळे गल्ली, तिवारे गल्ली, शांतीनगर, भुई गल्ली, जगदाळे प्लॉट, संजोग कॉलनी, धनगर गल्ली, नळ बाझार, जयभवानी रोड, विजय चौक या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली.

महापालिकेतील विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर, माजी महापौर हारुण शिकलगार, किशोर शहा, माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके, नगरसेवक मंगेश चव्हाण, करीम मेस्त्री, आयुब बारगीर, नगरसेविका वर्षा निंबाळकर, सौ. पवित्रा केरिपाळे, डॉ. सतीश नाईक, दत्ता सावंत, नामदेव चव्हाण, किरण जगदाळे, सागर घोडके, लालू मेस्त्री, शशिकांत माळी, युनुस महात, अमर निंबाळकर, मदिना बारुदवाले, शेरू सौदागर  आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.