Tue, Jul 07, 2020 23:47होमपेज › Sangli › शहराच्या विकासासाठी भाजपला साथ द्या

शहराच्या विकासासाठी भाजपला साथ द्या

Published On: Apr 19 2019 1:52AM | Last Updated: Apr 18 2019 9:03PM
सांगली : प्रतिनिधी

सांगली शहराच्या विकासासाठी खा. संजय पाटील यांना मताधिक्य देऊन भाजपला साथ द्या, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी शहरात विविध ठिकाणीब प्रचारसभा, बैठका घेण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते. येथील क्रमांक 11 मध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ  बैठक झाली.

बैठकीस माजी आमदार दिनकर, पाटील लोकसभा संयोजक शेखर इनामदार, माजी नगरसेवक शीतल पाटील, सुयोग सुतार, अतुल माने, दीपक माने, दरीबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, सुजित काटे, सचिन पाटील, अक्षय पाटील, गिरीश शिंगणापूर, किरण पाटील आदी उपस्थित होते. 

गाडगीळ म्हणाले, भाजपने शेतकरी, कष्टकरी, उद्योजक, व्यापारी, सर्वसामान्यांचा समतोल विकास केला आहे.  जिल्ह्यात संजय पाटील यांनी टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजनांद्वारे दुष्काळी भागात गंगोत्री  पोहोचवली आहे.  प्रभाग 17 मध्येही  गाडगीळ यांनी शहराच्या विकासासाठी साथ देण्याचे आवाहन केले.  माजी आमदार नितीन राजे शिंदे, मुन्ना कुरणे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेविका गीता सुतार, राहुल-ढोपे पाटील, खोकले साहेब, राजकुमार मगदूम, सुशील हडतरे आदी उपस्थित होते.

एक सहकारबुडवे, दुसरे घरभेदी...!

अंकली येथील सभेत माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, महाराष्ट्राचे भाग्यविधाते वसंतदादा पाटील यांनी सहकारातून सांगलीचे नाव देशभरात केले. त्यांच्या वारसादारांनी दादांच्या नावाच्या सर्व संस्था बुडविल्या. असे सहकारबुडवे आणि दुसरे भाजपने मोठे केल्यानंतर घरभेदी असलेले वंचित आघाडीच्या नावे जाती-पातीचे राजकारण करून मते मागत आहेत. अशांना जनतेने धडा शिकवावा. सर्वांगीण विकासाचा महामार्ग असलेल्या भाजपनेते संजय पाटील यांना साथ द्यावी. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले, महापौर संगीता खोत, अविनाश मोहिते, अंकलीचे सरपंच सुनील पाटील, माजी सरपंच किर्तीकुमार सावळवाडे, किरण कुंभार, प्रमोद खवाटे, पवन पाटील, सुरगोंडा पाटील, विद्यासागर मगदूम उपस्थित होते.