Mon, Jul 06, 2020 22:57होमपेज › Sangli › काँग्रेरसबरोबर खास मैत्री : खा. राजू शेट्टी

काँग्रेरसबरोबर खास मैत्री : खा. राजू शेट्टी

Published On: Apr 04 2019 2:02AM | Last Updated: Apr 03 2019 11:31PM
इस्लामपूर : प्रतिनिधी

गेल्या 10 वर्षांपूर्वी आम्ही काँगे्रसबरोबर नव्हतो, पण आमची खास मैत्री होती. आता लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म सांभाळू या, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार मोहनराव कदम अध्यक्षस्थानी होते. काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवा नेते विजय पवार आदी उपस्थित होते.

खा. शेट्टी म्हणाले, भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून आम्ही दूर झालो आहोत. या निवडणुकीत शेतकर्‍यांचा घात करणारे भाजपचे सरकार हटविण्याची नितांत गरज आहे. तरच शेतकर्‍यांना सुखाचे दिवस दिसू शकतील. केवळ शेतकर्‍यांच्या हितासाठीच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली आहे. 

काँगे्रसचे इस्लामपूर शहर अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी स्वागत केले. राजू वलांडकर यांनी आभार मानले. संदीप जाधव यांची भाषणे झाली. बैठकीस अ‍ॅड. आर. आर. पाटील, शिवानी चौगुले, रचना शिंदे, मीना बेलवणकर, पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.