Tue, Jul 07, 2020 00:04होमपेज › Sangli › शेतकर्‍यांसाठी शिवसेनेचा जोरदार लढा

शेतकर्‍यांसाठी शिवसेनेचा जोरदार लढा

Published On: Jul 27 2019 1:31AM | Last Updated: Jul 26 2019 8:15PM
सांगली : प्रतिनिधी

आम्ही सत्तेत असलो तरी राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने जोरदार लढाई सुरू केली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठीही  शिवसेना कटिबद्ध असून त्यासाठी  पक्षाचे हात बळकट करा, असे प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी  केले.  शिवसेना सांगली जिल्हा जनसेवा कार्यालयाचे लोकार्पण आणि छत्रपती संभाजी महाराज चौक, मार्गाचे उद्घाटन व नामकरण प्रा. पाटील यांच्याहस्ते झाले. त्यानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, महानगरपालिकेचे गटनेते युवराज बावडेकर, शहरप्रमुख महेंद्र चंडाळे प्रमुख उपस्थित होते. 

प्रा. बानुगडे पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्याच्या सत्तेत शिवसेना असली तरी विविध प्रश्नांसाठी आम्ही वेळोवेळी लढा उभारला आहे. पीक विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी करणे गरजेचे आहे. त्याविरोधात सेनेने लढाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्नशिल आहेत. आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. 

जिल्हाप्रमुख विभुते म्हणाले, जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीसाठी पदाधिकार्‍यांकडून प्रयत्न केले जात आहेत. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही आम्हाला नक्की चांगले यश मिळेल.  उपेक्षित दलित समाज परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सारवान, सफाई मजदूर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक, माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, श्रीकांत शिंदे, अमोल पाटील उपस्थित होते.