Fri, Jul 10, 2020 18:07होमपेज › Sangli › नागेवाडीत विहिरीत पडून शाळकरी मुलीचा मृत्यू

नागेवाडीत विहिरीत पडून शाळकरी मुलीचा मृत्यू

Published On: Mar 30 2019 1:31AM | Last Updated: Mar 29 2019 11:35PM
विटा : वार्ताहर

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. तमिषा राहुल निकम (वय 11, रा. नागेवाडी)  असे तिचे नाव आहे. याबाबत पोलिसपाटील जवाहर यादव यांनी वर्दी दिली आहे. 

तमिषा ही नागेवाडी येथे राहते.  नागेवाडी येथील शाळेत पाचवीत शिकते. गुरुवारी ती शेळ्या चारण्यासाठी शेतात गेली होती. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतातील  विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. सायंकाळी शेळ्या घरी आल्या परंतु, मुलगी आली नाही. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेताशेजारील  विहिरीवर तिच्या चपला दिसल्या. तसेच पाण्यात तिने सोबत नेलेली पाण्याची बाटली तरंगत होती. विहिरीत तिचा मृतदेह दिसला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. ए. काटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.