होमपेज › Sangli › पहिल्या फेरीपासूनच संजय पाटील यांची आघाडी 

पहिल्या फेरीपासूनच संजय पाटील यांची आघाडी 

Published On: May 23 2019 6:40PM | Last Updated: May 23 2019 6:54PM
सांगली :  प्रतिनिधी 

सांगली लोकसभा मतदार संघासाठीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी पहिल्या फेरी पासूनच चांगली आघाडी घेतली .अकराव्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम होती. त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होत गेला आणि कार्यकर्त्यात उत्साहाला उधाण आले. बाराव्या फेरीत स्वाभिमानी काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल पाटील यांना 1406 मताची आघाडी मिळाली, मात्र संजय पाटील यांच्या आघाडीच्या तुलनेत ही खूपच कमी आघाडी होती.

सांगली लोकसभा निवडणूक सुरुवातीला एकतर्फी होईल असेच वाटत होते . मात्र विशाल पाटील गोपीचंद्र पदळकर यांच्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली .शेवटच्या टप्प्यात तर कोण निवडून येणार याविषयी छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नव्हते . मतदान चुरशीने झाल्यामुळे निवडणूक निकालाबाबत  पैजाही लावल्या.  काय निकाल लागणार याची उत्सुकता लागलेली होती.

रुवारी मतमोजणी दिवशी सकाळी सहापासूनच उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्रावर आले होते . पहिल्या फेरीला मतमोजणीला थोडी उशिरा सुरुवात झाली. पहिल्या फेरीतील काही भागात विशाल पाटील यांनी आघाडी घेतली होती . मात्र पहिल्या फेरीअखेर संजय पाटील यांना 9 हजार 743 मतांची आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत 9719 मतांची आघाडी मिळाली . ही आघाडी अकराव्या फेरीअखेर संजय पाटील यांची कायम होती. साधारणता नऊ हजार ते पंधरा हजार पर्यंत ही आघाडी राहिली. संजय पाटील यांना प्रत्येक फेरीत आघाडी मिळत असल्याने ्यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसून येत होता .निकालाचा कल पाहिल्यानंतर जल्लोष करण्यासाठी अनेक कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर निघून गेले.

पाचव्या फेरीत वंचित बहुजन आघाडी चे गोपीचंद पडळकर यांना वीस हजार 239 मते मिळाली ही मते विशाल पाटील यांच्या पेक्षा थोडी जास्त होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली होती. मात्र पुढील सहाव्या फेरीत पडळकर हे पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर गेले .अकराव्या फेरीत पडळकर यांना वीस हजार 590 तर विशाल पाटील यांना 8893 मते मिळाली त्यानंतर तेराव्या फेरीत पडळकर यांना 23 हजार 445 तर विशाल पाटील यांना 18 हजार 122 मते मिळाली. विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात अनेक फेऱ्यांमध्ये मतांची आकडेवारी कमी जास्त होत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांचा जीवही टांगणीला लागलेला दिसत होता . तेराव्या आणि चौदाव्या फेरीत गोपीचंद पडळकर यांना विशाल पाटील पेक्षा जास्त मते मिळाली होती.

विशाल पाटील यांचा दुपारपर्यंत मतमोजणी केंद्रात तळ 

स्वाभिमानी ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील हे सकाळी नऊ वाजताच मतमोजणी केंद्रात आले होते .दुपारपर्यंत ते मतदान केंद्राच्या आवारात थांबून होते .कोणत्या भागात किती मते मिळाली याबाबत ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते. 

केंद्रावर काय झाले यकार्यकर्त्यांना उत्सुकता 

 उमेदवारांचे कार्यकर्ते मतमोजणीच्या वेळी केंद्रावर उपस्थित होते. अनेक जण आपल्या केंद्रआत कुणाला मताधिक्य मिळाले याची चौकशी करत होते. काहींना अपेक्षित मते पडलेली न दिसल्याने नाराज होऊन त्यांनी काढता पाय घेतला.