Fri, Jun 21, 2019 01:34होमपेज › Sangli › बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी कांबळे, कदम यांची निवड

बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी कांबळे, कदम यांची निवड

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 16 2017 1:48AM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

बँकॉक येथे होणार्‍या मिस्टर अशियायी बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी मिरज येथील विशाल कांबळे आणि विटा येथील नटराज कदम यांची निवड झाली आहे.  मिस्टर आशियायी स्पर्धेसाठी  दिल्लीत मार्चमध्ये निवड चाचणी घेण्यात आली. त्यात कांबळे हा 80 किलो वजनी गटातून तर कदम हा 85 किलो वजनी गटातून विजेता ठरला. त्यानंतर आता 17 ते 21 डिसेंबर दरम्यान बँकॉक येथे मुख्य स्पर्धा होणार आहे. न्यू बॉडी बिल्डिंग असोसिएशनतर्फे पुढील महिन्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कांबळे आणि कदम यांची स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात  आला.