Fri, Jul 03, 2020 16:53होमपेज › Sangli › सांगलीला ‘काँग्रेसमुक्त’चा  पहिला मान : आ. खाडे

सांगलीला ‘काँग्रेसमुक्त’चा  पहिला मान : आ. खाडे

Published On: Apr 20 2019 1:54AM | Last Updated: Apr 19 2019 11:19PM
आरग : वार्ताहर  

काँग्रेसमुक्त होण्याचा  देशात पहिला मान सांगलीला मिळाला आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश खाडे यांनी केले.  

भाजप-शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी आरग (ता. मिरज) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये आमदार खाडे बोलत होते.
ते म्हणाले, (स्व.) वसंतरावदादा पाटील हे महान नेते होते.  मात्र आता ती परिस्थिती राहिली नाही. स्वतःचे कर्तृत्व नसताना उसने कर्तृत्व घेऊन कोणती  दिशा देणार याचा विचार मतदारांनी करून विकासाची कामे पूर्ण करणार्‍या भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार संजय पाटील यांना संसदेमध्ये जाण्याची संधी द्यावी. 

माजी महापौर विवेक कांबळे  म्हणाले,  पंतप्रधान मोदी नरेंद्र यांच्यामुळे भारताची जगात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांची ताकद वाढविण्यासाठी पुन्हा एकदा भाजप-शिवसेना व मित्र पक्षांच्या युतीच्या उमेदवाराला मिरज पूर्वभागातून प्रचंड मताधिक्य देण्याचे आवाहन केले.

यावेळी संजय विभूते, हरिश शेंगणे, तुकाराम पाटील, जिल्हापरिषद सदस्या सरिता कोरबू, पंचायत समिती सदस्या सुनीता पाटील, एस.आर. पाटील, उपसरपंच अनिल कोरबू यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.