Fri, Sep 20, 2019 21:54होमपेज › Sangli › सांगली : विट्यात ऑक्सिजनकिटसह वृद्ध महिलेने केले मतदान(video)

सांगली : विट्यात ऑक्सिजनकिटसह वृद्ध महिलेने केले मतदान(video)

Published On: Apr 23 2019 4:30PM | Last Updated: Apr 23 2019 4:43PM
विटा : प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील गार्डी येथील स्वातंत्र्य सैनिक कै. सुबराव अप्पाजी बाबर  यांच्या पत्नी  कुसुम सुबराव बाबर ( वय ८५ ) असलेल्या महिलेने मतदान केले.  

विशेष म्हणजे कुसुम बाबर ही वृद्ध महिला गेलेदोन महिने ऑक्सिजन गॅसवर आहेत.  तरी त्यांनी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी गावातील तरुण मुलांनी त्यांना ऑक्सिजनकिटसह मतदान केंद्रात घेऊन येऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यात मदत केली. आपल्या लोकशाही प्रती असलेल्या या जागृकतेमुळे त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.  मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते आपण बजावलेच पाहिजे हा संदेश बाबर यांनी आपल्या कृतीतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.