होमपेज › Sangli › सांगली : अजितराव घोरपडेंचा अर्ज दाखल

सांगली : अजितराव घोरपडेंचा अर्ज दाखल

Published On: Oct 04 2019 2:51PM | Last Updated: Oct 04 2019 2:45PM

अजितराव घोरपडे यांनी शुक्रवारी तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तासगाव : प्रतिनिधी

माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी शुक्रवारी तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, खासदार संजय पाटील, माजी आमदार रमेश शेंडगे, शिवसेनेचे माजी सांगली जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, पांडूरंग पाटील यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यासोबतच सांगली जिल्‍ह्‍यातील कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी आज (ता.४) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे