होमपेज › Sangli › युवतीवर बलात्कार, जबरदस्तीने गर्भपातही : एकावर गुन्हा दाखल

युवतीवर बलात्कार, जबरदस्तीने गर्भपातही : एकावर गुन्हा दाखल

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 1:13AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील शंभर फुटी रस्ता परिसरातील एका युवतीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर पाच महिने सातत्याने बलात्कार करण्यात आला. त्याशिवाय तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी एकावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली. 

इम्रान पठाण (रा. पाकिजा मस्जिदमागे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. पीडित युवती शंभर फुटी रस्ता परिसरात राहण्यास  होती. 
त्यावेळी त्याने तिच्या घरी जाऊन ओळख वाढविली. त्यानंतर त्याने जूनमध्ये ती घरी एकटीच असताना तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत सातत्याने तो अत्याचार करीत होता. 

यामुळे तिला गर्भ राहिला होता. ते समजल्यानंतर इम्रानने जबरदस्तीने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्याने सातत्याने ठार मारण्याची धमकी दिल्याने आतापर्यंत फिर्याद दिली नव्हती असे पीडितेने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी इम्रानवर बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.