होमपेज › Sangli › 'राजू शेट्टींना परिणाम भोगावे लागणार'

'राजू शेट्टींना परिणाम भोगावे लागणार'

Published On: Apr 01 2019 3:08PM | Last Updated: Apr 01 2019 5:19PM
इस्लामपूर : वार्ताहर

प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका घेऊन शेतकर्‍यांचा विश्र्वासघात करणार्‍या राजू शेट्टींना त्य‍ाचे नक्की परिणाम भोगावे लागतील. ज्यांनी ऊस आंदोलनात शेतकर्‍यांच्‍यावर गोळ्या घातल्या त्यांच्याच मांडीला मांडी लावून स्वार्थासाठी ते बसले आहेत, असे प्रतिपादन  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

पेठ (ता.वाळवा) येथे विकास आघाडीच्या झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, धर्यशील माने, राहुल महाडिक , सम्राट महाडिक, आनंदराव पवार, सी.बी. पाटील, विक्रम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

 चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने महाडिक कुटुंबाची अडचण झाली आहे. तरीही नानासाहेब महाडिक यांनी धाडसाने आमच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. ज्या राजू शेट्टींना महाडिक व विकास आघाडीने १० वर्षे साथ दिली त्यांचाही त्यांनी विश्र्वासघात केला आहे. त्यामुळे शेट्टींच्या पराभवासाठी आता त्यांना साथ देणार्‍यांनाच काम करावे लागणार आहे.