होमपेज › Sangli › रेल्वेच्या तत्काळ तिकिटाचा काळाबाजार : एकास अटक

रेल्वेच्या तत्काळ तिकिटाचा काळाबाजार : एकास अटक

Published On: Oct 20 2018 1:47AM | Last Updated: Oct 19 2018 10:56PMमिरज : प्रतिनिधी 

रेल्वेच्या तात्काळ आरक्षित तिकिटांचा काळाबाजार केल्या प्रकरणी आशिष विजय रावळ याला रेल्वे सुरक्षा दलाच्या मिरज आणि कोल्हापूर येथील संयुक्त पथकाने शुक्रवारी जयसिंगपूर स्थानकात अटक केली.

मिरज येथील सहायक उपनिरीक्षक आर. डी. पाटील, मुकुंद डुबल, मारुती जाधव, कोल्हापूर येथील सहायक उपनिरीक्षक अनिल सरवदे यांनी भाग घेतला होता. रावळकडून 3435 रुपये किंमतीचे रेल्वेचे तत्काळ आरक्षित तिकीट व रोख 400 रुपये जप्त केले. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण संपल्याने तत्काळ आरक्षणसाठी रेल्वे एजंट आता छोट्या स्थानकाकडेही वळले असल्याचे दिसून येते.