इस्लामपूर : मारूती पाटील
वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय विकास आघाडीची मोट बांधण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे खासदार राजू शेट्टी व महाडिक गटाच्या नव्या भूमिकेमुळे आघाडीच्या एकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत दुसर्यांना मदतीचा हात देणार्या महाडिक बंधूंचा यावेळी कोण पैरा फेडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आ. जयंत पाटील यांच्या विरोधात विकास आघाडीची मोट बांधण्यात ना. सदाभाऊ खोत, खा. राजू शेट्टी, आ. शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, सी. बी. पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या एकीमुळे इस्लामपूर पालिकेत सत्तांतर झाले. जिल्हा परिषद निवडणुकीतही चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीतही ही आघाडी अभेद्य राहून आ. जयंत पाटील यांच्यासमोर विरोधक आव्हान उभे करतील, असे चित्र होते.
मात्र ना. खोत व खा. शेट्टी यांच्यातील फाटाफूट, खा. शेट्टी यांची काँगे्रस आघाडीशी झालेली ‘गट्टी’ यामुळे यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना वाळवा तालुक्यात विकास आघाडीबरोबर राहील याची शक्यता नाही. त्यातच विकास आघाडीकडून आ. जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वानुमते उमेदवार निश्चित होईल, असेही वातावरण नाही. शिवसेनेची भूमिकाही आता महत्त्वाची आहे.
पाटील, महाडिक चर्चेत
सध्या भाजपचे विधानसभेचे उमेदवार म्हणून निशिकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. विकास आघाडीचे पंचायत समितीतील गटनेेते राहुल महाडिक हेही वाळवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM
May 06 2018 1:10AM