Sun, Jul 05, 2020 15:55होमपेज › Sangli › राष्ट्रवादीकडून माझ्यावर राजकीय अन्याय : आ. पृथ्वीराज देशमुख

राष्ट्रवादीकडून माझ्यावर राजकीय अन्याय : आ. पृथ्वीराज देशमुख

Published On: Jun 01 2019 2:03AM | Last Updated: May 31 2019 8:20PM
कडेगाव : वार्ताहर 

गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी मला पदापासून दूर ठेवत अन्याय केला  होता.आमदारपद देऊन भाजपनेच माझा मोठा सन्मान केला, असे  प्रतिपादन आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी  केले.

येथे विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार सभारंभ कार्यक्रमात बोलत होते.   त्याआधी पृथ्वीराज देशमुख यांची  शहरात मिरवणूक काढण्यात आली. आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपस्थित  होते. 

आमदार  देशमुख म्हणाले,  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तीन वेळा विधानपरिषदेवर बिनविरोध निवडण्याची संधी आली होती. परंतु मला डावलण्यात आले. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून आमच्या  कार्यकर्त्यांना मोठी ताकद मिळाली आहे. या मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत.

ते म्हणाले,  गेल्या पाच वर्षांत ताकारी , टेंभू व म्हैसाळ योजनेला गती मिळाली.चंद्रकांत मोरे, लक्ष्मण माने, चंद्रसेन देशमुख, धनंजय देशमुख, सभापती मंदाताई करांडे, उपसभापती रवींद्र कांबळे यांच्यासह  कार्यकर्ते मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

विश्‍वजित कदम यांचे भाजपमध्ये स्वागत

 आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्यासंदर्भात पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख म्हणाले,  ते आमच्या  पक्षात आल्यास त्यांचे स्वागतच करू. पण कोणीही भाजपमध्ये आले तरी त्यांना येथे आमचेच ऐकावे लागेल, हे मात्र नक्की आहे.  पलूस- कडेगाव मतदार संघातील निवडणूक लढवू आणि जिंकूही.