Mon, Sep 16, 2019 06:29होमपेज › Sangli › दोन पिस्तुलांसह एकाला अटक

दोन पिस्तुलांसह एकाला अटक

Published On: Mar 02 2019 1:17AM | Last Updated: Mar 01 2019 11:43PM
सांगली : प्रतिनिधी

शहरातील संजयनगर येथील लव्हली सर्कलजवळ देशी बनावटीची दोन पिस्तुले घेऊन फिरणार्‍याला अटक करण्यात आली. दिनेशकुमार गोपीलाल चौधरी (वय 31, रा. झडोल, जि. भिलवाडी, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन पिस्तुले, सहा काडतुसे असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुंडा विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांचे एक पथक शहरात गस्त घालत होते. त्यावेळी लव्हली सर्कल परिसरात एक युवक पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती त्यांना खबर्‍याद्वारे मिळाली. 

पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि  सहा जिवंत काडतुसेही सापडली. त्याला  अटक करण्यात आली.  संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहाय्यक निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाने परमेश्‍वर नरळे, अरूण औताडे, शंकर पाटील, सागर लवटे, वैभव पाटील, सुप्रिया साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.